स्व: परिचय
वेदशास्त्र संपन्न, वेदमूर्ती आणि मठाधिपती
मी वेदशास्त्र संपन्न, वेदमूर्ती आणि मठाधिपती. माझे स्वत:चे शिक्षण माझ्या गावी झाले, वयाच्या सातव्या वर्षी मी राजापूर येथे वैदिक पाठशाळेत माझे वैदिक अध्ययन झाले आणि अध्यात्मिक साधना आणि शक्तिलोक साधना सुरु झाली. माझे वेदशास्त्रांचे अध्ययन पूर्ण झालेले आहे. काही कठिनातल्या कठीण गोष्टीची अध्यात्मीक साधना, तपश्चर्या मी केलेली आहे. वेद शास्त्र, पुराण उपनिषद, संताची वेगवेगळी चरित्र, गुरुपरंपरा, साधुसंत व महात्म्यांचि चरित्र वाचन, अभ्यास करून संशोधन करून गेली ३५ ते ४० वर्षे या अनुष्ठानाचा अनुभव माझ्याकडे आहे.
आज पर्यंत अनेक ठिकाणी जाऊन साधना तपश्चर्या आणि कठीण योग साधना केलेली आहे. अनेक तीर्थ क्षेत्र आणि काही ठिकाणी राहून गुप्त गोष्टी करुन आलो आहे. अनेक दत्तात्रेयांच्या स्थाना मध्ये जाऊन असे काही प्राचीन काही ग्रंथ आहेत त्याचे पारायण आणि साधना केली आहे. काही अनेक जंगलात तप केले. खूप दिवस राहुन एकांत वास करुन हठयोग आणि अध्यात्मिक गोष्टीवर संशोधन केले आहे. साधना पण केली आहे. अनेक वर्षांपासून एका ठिकाणी, एका आसनावर बसून काही न खाता-पीता ध्यान-धारणा तप केलेले आहेत. अखंड गुरु चरित्र ग्रंथ पठण वर्षांनुवर्ष केले आहेत. तसेच वैदिक मंत्रावर पण मोठ्या प्रमाणात संशोधन केले आहे.
गेली चाळीस वर्षात खुप काही गोष्टी अश्या केल्या आहेत की या कार्यामुळे समाजाला खुप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला दिसत आहे. गेली कित्येक वर्ष स्वामीसमर्थ महाराज यांचे स्थान माझ्या वास्तूमध्ये आहे आणि सर्वात मोठा याचा फायदा समाजाला झालेला आहे. काही मानवांचा तर उध्दार झालेला आहे. समाजातील गोर गरीब यांना खूप मदत पण केली आहे. अनेक वैदिक आणि कठीणच असलेली साधना करत आलो आहे. ही साधना खूपच कठीण व नियम सुद्धा कठीण होते आजच्या काळात जे शिक्षण आहे त्या पेक्षा खूपच कठीण होते. प्रवास खूप त्रासदायक होता. अशा अनेक साधना आहेत ज्या खूप कठीण होत्या पण त्याबद्दल मी काही सांगू इच्छित नाही. तरीही न डगमगता मी माझी साधना सुरू ठेवली व हठयोग साधना पूर्ण केली.
