स्थानातील मूर्तीचे वैशिष्ट्य

‘न भूतो न भविष्यति’ अशी स्वामींची भव्य दिव्य मूर्ती तयार होत आहे

  1. आतापर्यंत  स्वामींची समाधी अवस्थेतील मूर्ती सर्वत्र दिसण्यात येते पण आपल्याकडे प्रथमच शाश्वत मुद्रेत स्वामी येत आहेत
  2. नवग्रहांच्या खड्याचा चुरा करून १३०० डिग्रीला तापवून यांचे द्रवरूपांतर करून मूर्तीमध्ये घालण्यात येणार
  3. १८ नद्यांचे तीर्थ त्यात घालण्यात येणार आहे.
  4. अष्ट धातूची (सोने, चांदी, तांबे, कास्य, जस्त, लोह, कथील व पारा)
  5. मूर्तीची उंची ६ फुट आहे व वजन १ टन आहे. ही अष्टधातूंमधील अखंड मूर्ती प्रथमच भारतात आपल्या स्थानात स्थानापंन्न होणार आहे.

नवग्रहांच्या मूर्तीबद्दल

  1. नवग्रहांच्या प्रत्येक ग्रहांना त्यांची रत्न वापरली जातील. त्या रत्नांची पावडर करून त्यापासून मूर्ती घडवण्यात येईल.
  2. प्रत्येक ग्रहांच्या भाग्यांकानुसार त्या मूर्तीचे वजन असणार.
    उदा. बुधाचा भाग्यांक ८ आहे तर मूर्तीचे वजन ८० किलो असेल. अशा सर्व मूर्ती त्या ग्रहांच्या भाग्यांकानुसार १०० किलो वजनाच्या आत होतील. शास्त्राप्रमाणे रत्नांची पावडर करून नवग्रहांच्या मूर्त्या प्रथमच भारतात या स्वामी स्थानात होणार आहेत.

इतर विशेष मूर्ती

  1. श्री गणपती व रिद्धी-सिद्धी या मूर्ती अष्टधातूंमधील आहेत.
  2. श्री कालभैरवांची मूर्ती सात प्रकारची भस्म वापरून तयार करण्यात येत आहे.
  3. प्रवेशद्वाराजवळ औंदुबराच्या झाडांखाली श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती ही दत्तप्रिय वृक्षांच्या (बेलपत्र, औंदुबर, वड, पिंपळ, श्वेतार्क) या वनस्पतींच्या मुळीचा वापर यांत केला जाणार आहे. ही सुवर्णतत्वातील मूर्ती असेल.
  4. तसेच श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची मूर्ती रूद्राक्ष, बेलफळ, उंबर या तीन फळांच्या मिश्रणाने तयार केली जाणार आहे (मटेरिअल क्लियर कास्ट) मधील. याच औंदुबराच्या झाडाखाली स्थानापन्न केली जाणार आहे. रजतत्त्वातील ही मूर्ती २ फुट ऊंचीची असेल.

या सर्व मूर्ती विशिष्ट योग, विशिष्ट मुहूर्त, विशिष्ट वेळ, शास्त्रीय व पारंपरिक पद्धतीने तयार करण्याचे काम सुरू आहे. याला साधारण सोळा महिन्याचा कालावधी लागणार आहे. अष्टधातूंमधील मूर्त्या तयार करणे हे खूपच कठीण काम म्हणजे जीवघेणा प्रकार आहे. तरी आमचे पुण्याचे सृजनशील सुप्रसिद्ध शिल्पकार श्री प्रशांत खेडकर हे स्वामी स्थानातील सर्व मूर्ती घडवण्याचे काम करत आहेत.

भारतातील प्रथम ‘न भूतो न भविष्याति’ असे एकमेव स्थान वेदमूर्ती, वेदशास्त्रसंपन्न, योगतपस्वी, हठयोगाचार्य, शक्तीपात योगदिक्षा ग्रहण, मठाधिपती श्री गुरूमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली व महागुरूंच्या आशीर्वादाखाली हे स्थान निर्माण होत आहे.

अतिरिक्त वैशिष्ट्ये

  1. आजपर्यंत कोणत्याही मूर्तीमध्ये वनस्पतीचा वापर झालेला नाही.
  2. सर्व पंचतत्वे (जल, वायू, अग्नि, आकाश, पृथ्वी) या तत्त्वांचा समावेश करून मूर्ती घडवल्या जात आहेत.
  3. या मूर्तीचा संकल्प करून, मूर्तीचे मातीपूजन करून याच मातीत या मूर्ती घडवल्या जात आहेत.