पूजेचे महत्व आणि माहिती

आजच्या कलियुगात मानवाचे जीवन हे फार व्यस्त झालेले आहे, पैसा व वेळ या दोन्ही गोष्टींचा विचार करत आम्ही मानवाला कोणत्याही गोष्टीचे अवडंबर करून न देता सात्विक प्रार्थना करून त्याला सन्मार्ग दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. म्हणून आम्ही स्वतः काही नियमांचे पालन करतो. आम्ही कोणतीही वस्तू विकत घ्या असे सांगत नाही, आम्ही पूजेसाठी घेतलेले सर्व सामान व वस्तू गरिबांमध्ये वाटून टाकतो. त्यावर आमची कोणतीही इच्छा, वासना नसते. आम्ही कोणाकडेही अन्नपाणी ग्रहण करत नाही. आम्ही दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून न राहता न खाता पिता आठ ते दहा तास सलग बसून कोणतेही यज्ञ, याग, अनुष्ठान, पूजा, अर्चा, ग्रंथ पठण करू शकतो. अशा सात्विक पद्धतीचे अनुष्ठान आम्ही 35 ते 40 वर्षात लाखो, करोडो अनुष्ठाने केलेली आहेत, यापुढेही करू शकतो.

एका गोष्टीची नोंद घ्यावी, सदर वरील अनुष्ठानांमध्ये आम्ही संशोधन करून तयार केलेलीच अनुष्ठाने केली जातील. इतर कोणतेही मोठे यज्ञयाग, अनुष्ठान असतील तर ते मंत्र येणाऱ्या व्यक्तींची मदत घेऊनच केली जातील. तसेच यज्ञ, याग आम्ही आपल्या घरी किंवा बाहेर आपल्याला करून देऊ शकतो. त्यासाठी लागणारे पूजेचे साहित्य आम्ही खरे तर देत नाही. कारण (कोणतेही पूजेचे सामान एकदा पूजा केल्यानंतर वापरता येत नाही). (तो विधी, पूजा झाल्यानंतर पूर्णपणे ते सामान दान करावे लागते). (त्यामुळे ते येथेही वापरता येत नाही). (त्यामुळे कोणती पूजा, यज्ञ हे सर्व सामानासहित करा असे कोणीही सांगू नये). गरज पडल्यास आम्ही पूजेच्या सामानाची व्यवस्था ठेवली आहे.

आपल्या समस्येनुसार मार्गदर्शन करून कोणते विधी करावे त्याचे मार्गदर्शन करतो. जेव्हा नवीन वास्तू घेतले जाते तेव्हा आम्ही खूपच वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतो, जेणेकरून नुसती वास्तुपूजा, वास्तुशांती नाही तर त्यापुढे खूपच मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन लागते, हे आम्ही करतो. तसेच ज्यावेळी विवाह होतो त्यावेळी महत्त्वाचे अनुष्ठान वेदांमध्ये सांगितले आहे व कोणीही करत नाही, ती अनुष्ठाने कसे व काय करावे त्यावर आम्ही भरपूर अभ्यास आणि संशोधन केले आहे, त्यानुसार आम्ही मार्गदर्शन करतो. त्या विधीमध्ये सुद्धा दोन प्रकारचे विधी आहेत. त्या व्यक्ती कशा आहेत व एकंदर परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेतो आणि अनुष्ठान करतो.

आजपर्यंत 4000 ते 5000 विवाह अनुष्ठाने आम्ही केलेली आहेत व ती पूर्णपणे चांगल्या प्रकारे झालेली आहेत व त्याचे फळही खूप मोठ्या प्रमाणात आहे, कारण हे अनुष्ठाने म्हणजे पूजा, अर्चा, हवन विधी नाहीत. हे फक्त मंत्रशक्तीचे अनुष्ठान आहे व याचे संशोधन आम्हीच केले आहे. तसेच लघुरुद्र, महारुद्र याच्यावर आम्ही संशोधन केले आहे, त्याचाही फायदा भरपूर प्रमाणात आहे. गेल्या 40 वर्षांत अनेक लाख कोटी याचे जप, अनुष्ठान मोठ्या प्रमाणात केले व याची मोठ्या प्रमाणात अनुभूती आली आहे आणि अनेक लोकांचे दोष परिहार झालेले आहेत व ते मानव सुखी व संपन्न आहेत.

आजपर्यंत अनेक पूजा, महापूजा, अर्चना, वेगवेगळे जप, अनुष्ठान, अनेक यज्ञ, याग आम्ही केलेले आहेत. त्याचा फायदा पूर्णपणे सर्व स्वामीभक्तांना झालेला आहे. आमचे सर्वात कलियुगात मोठे लक्ष हे आहे की प्रार्थनेने, मंत्रशक्तीने, वैदिक सूक्तांनी फार मोठे जप, अनुष्ठान केल्यामुळे मानवांना बऱ्याच प्रमाणात फायदा होऊ शकतो, हे आम्हाला पूर्णपणे पटले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी अशी जप, अनुष्ठाने करावी व आपल्या चांगल्या प्रकारे प्रगती करून घ्यावी, कारण देवता या सर्व मंत्रशक्तीच्या अधीन राहूनच काम करत असतात, हे माझ्या पूर्णपणे लक्षात आले आहे (मंत्राधीन देवता).

कलियुगात नामस्मरण आणि मंत्रजप शक्तीला फार जास्त महत्त्व दिलेले आहे, त्यामुळे या गोष्टीवर मानवाने जास्तीत जास्त विचार करावा व प्रार्थना करावी. प्रार्थना कशी करावी याचे मार्गदर्शन आम्ही आपणाला करतो व उच्चार कसे असावे हेही सांगतो. काही गोष्टी असतील आणि त्याचे निराकरण होत नसेल, तर त्यावर योग्य माहिती देऊन त्याला त्याच्यातून बाहेर यायला मदत करतो. प्रत्येक वेळीच पूजा, अनुष्ठान, यज्ञ हे सर्व भाविकांना शक्य नाही, त्यामुळे काही गोष्टी प्रार्थनेने सुद्धा 100% बऱ्या होऊ शकतात, एवढी कलियुगात प्रार्थनेमध्ये ताकद आहे.

आमच्याकडे अशी लाखो माणसे आजपर्यंत प्रार्थनेच्या मार्गामुळे सुखी व संपन्न झाली आहेत. प्रत्येक वेळा विधीच पाहिजे असा मानवाचा हट्ट असू नये असे मला वाटते. मंत्रशक्तीवर आमच्याकडे सांगण्यासारखे व करण्यासारखे भरपूर प्रमाणात आहे. ज्याला जशी गरज, त्याला तसे मार्गदर्शन आम्ही करतो.

आमचे नियम व अटी

  1. कोणतेही पूजा विधी आठ दिवस अगोदर
  2. आमचा प्रवास खर्च अगोदरच पाठवणे गरजेचे
  3. आम्ही सांगितलेल्या सर्व नियम पाळणे गरजेचे आहे
  4. वरील सर्व पूजा आणि सर्व विधी यांचे पेमेंट पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील
  5. पेमेंट झाल्यावर त्याचा फोटो आम्हाला पाठवणे गरजेचे आहे
  6. बाहेरगावी असेल तर उतरण्याची सर्व व्यवस्था करणे गरजेचे आहे
  7. सर्व पूजा, विधी, अनुष्ठान हे ऑनलाईन पद्धतीने करून दिले जाईल
  8. आम्ही मोकळी जमीन, घर, ऑफिस आणि इतर गोष्टीसाठी साईट विजिट करतो (चार्जेस लागू)
  9. (वरील सर्व अटी लागू)

वरील सर्व प्रसारित माहिती आणि सर्व पूजा, विधी, अनुष्ठान आणि इतर गोष्टी संपर्क केल्यानंतर दिली जाईल याची नोंद घ्यावी.