सध्याचे कार्य व भावी योजना

ध्यान, योग, सर्व प्रकारच्या पूजा, विधी-विधान (निरंतर चाळीस वर्षांपासून) करत आहोत. यासाठी श्री सद्गुरु कृपा वैदिक फाउंडेशन ची स्थापना २०२५ मध्ये करण्यात आली आहे.
गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले कार्य:
- स्वामींचे स्थान निर्माण
- नक्षत्र बाग निर्माण
- नवग्रहांचे मंदिर निर्माण
नवीन उपक्रम योजना:
- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या विषयांची संस्कृत वैदिक पाठशाळा (वेदांचे कार्य) निर्माण
- वैदिक कार्याचा प्रचार करणे
- भारताचे आध्यात्मिक ज्ञान जतन करून भावी पिढीपर्यंत पोहोचवणे
- सण, मेळावे, सामूहिक विवाह आणि धार्मिक सोहळे साजरे करणे
- वैदिक मंत्राच्या लहरी शक्ती यावर विशेष संशोधन करून वैदिक मंत्राचे जप अनुष्ठान करणे
- अनाथाश्रम, वृद्धाश्रम यांना प्रत्यक्षात वस्तूस्थिती बघून मदत करणे
- शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना मदत करणे
मदत आणि पूजा-अभिषेक
वरील कार्यासाठी ज्या भाविकांना मदत करायची इच्छा असेल त्यांनी आमच्या ईमेल किंवा व्हॉट्सऍपवर संपर्क साधावा. ज्या भाविकांना पूजा, अभिषेक करायची असेल त्यांनी आमच्या जीपे, बँक डिटेलवर पैसे पाठवू शकता. आमच्या व्हॉट्सऍपवर त्याचा स्क्रीनशॉट पाठवावा, सोबत नक्षत्र, गोत्र पाठवावे.