🌹॥श्री स्वामीसमर्थ॥ 🌹
गुरूमाऊलीं ती आमची गुरूमाऊलीं॥
सुखाचा सागर,
प्रेमाचा आगर,
ज्ञानाचा जागर,
गुरूमाऊलीं ती आमची गुरूमाऊलीं॥
भक्तांची सावली ती,
अनाथांची माऊली ती,
निराधारांचा आधार ती,
गुरूमाऊलीं ती आमची गुरूमाऊलीं॥
भक्तांच्या साह्यास जाई धावून,
सोडवी ती प्रारब्धाची गाठ,
करी पापांचे खंडन,
करी अहंकाराचे हरण,
देई मुक्तीचे मंडन,
गुरूमाऊलीं ती आमची गुरूमाऊलीं॥
अशी ही कामधेनू माऊली,
तिच्या चरणांशी सर्व तिर्थक्षेत्र ,
गुरूमाऊलीं ती आमची गुरूमाऊलीं॥
🪷॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🪷
माया

